– शौनक फडणीस
हे असच अनपेक्षितपणे होतं. विचारांच्या गर्दीत वावरत असताना आपण ‘स्व’ विसरतो. आसपासचं “surrounding” विसरतो. Rational असण्याच्या higher caste गर्दीतून सहज कुठे एका ठिकाणी ‘ती’ आकार घेते. ‘ती’ म्हणजे कोण? ती म्हणजे सर्वच. आजपर्यंत जे अनुभवतो ते. आणि जिवंत असण्याची अनुभूती देणारी ‘शक्ती’? मग सगळे विचार ‘ती’चा पाठलाग करू लागतात. हे चित्त शांत असलं तरीही मन सैरभैर होतं. ‘ती’ स्वच्छंदपणे रूप धारण करते आणि वावरू लागते, बागडू लागते. म्हणावं तर एक प्रकारचा “nausea” पण येतो. येणारच! नेहमीच ‘ती’ व्याप नाही घेत अशी. मग गळ्यात सहज एक हुंदका दाटून येतो. कल्पनेचं पाखरू विचारांना ओढून ‘ती’च्यावर स्वार होतं. ‘ती’ सर्वव्यापी होते. कारण मी तर इथेच होत्याचा नसतो. ‘ती’ सर्वव्यापी होते पण ती एक अनंत डोहसुद्धा होते. आजूबाजूला बघितल्यावर लक्षात येतं की मनःपटलावर काही उमटेनासं झालय. बाहेरून येणारे सर्व आवाज mute झालेले असतात. डोळ्यांसमोरून फक्त चित्रे हलतात. गळ्यातला हुंदका तसाच राहतो. ‘ती’ येते तशीच हळूच लुप्त होते. मनाला मात्र हुरहूर लागून राहते. मी जागेवर असल्याचं भान परत प्राप्त होतं. दिवे लागणी होत असते. अंधार दाटून येत असतो. विचारांच्या गर्दीत मी परत स्वतःला हरवून बसतो. हुरहूर लागून राहते.
क्षणाक्षणाला गोंधळ वाढत जातो. कान तप्त होतात. आजूबाजूला माणसच माणसं जमा होतात. आपण त्यांचं ऐकावं आणि आपण बोलावं अशी एक अवाजवी व साधारण अपेक्षा ठेवतात, गप्पा-गोष्टी ‘coherence’ ची चिंता न करता सुरू असतात. पण कुठेतरी असा एक क्षण येतो जेव्हा हे स्वर चित्रविचित्र आवाजात रूपांतरित होतात. मन वेडावतं. सोबतची माणसं नकोशी होतात. फार त्रास होतो हो त्याचा. दोन क्षणांपूर्वीच सैरभैर बागडणारं मन ताळ्यावर येतं. प्रचंड वीट येतो ह्या (अ)परिचित आवाजांचा. इच्छा असते ती स्वतःचा आवाज ऐकण्याची! किंवा कुणातरी जिवाभावाच्या सोबतीची. ह्यालाच temporary alienation म्हणायचं का?
का माणसाला सारखं socialize करावं लागतं? समाजाला ‘oddballs’ का सहन होत नाहीत? मनाला फक्त प्रश्नच पडतात. अथवा तक्रारी म्हणा. दोन घटका स्वतःच्या मिळणं ही अवाजवी मागणी ठरते का?
पण, असं काय मोठ्ठं करून बसतो आपण ह्या दुर्मिळ क्षणांमध्ये? का महत्वाचे आहेत हे क्षण? चौकोनात बघत बसणं? संगीतात गुंग होणं? काहीतरी लिहिणं?
नाही! हे क्षण महत्वाचे असतात कारण ह्यात काहीतरी वेगळच आहे! वर सांगितलेल्यापैकी काहीही करण्याची शक्ती नसते. करणार तरी कसं?! थकवा येतो हो! सारखे आवाज ऐकून!
मनःपटलावर तरंग उमटण्याचे असतात हे क्षण. दिशाहीन होतात पण हरवत नाहीत विचार! स्वतःला विसरण्याची क्षमता येते.
कथाचित्र – मावनी
फार चांगला विषय विचार करावाच लागेल अशा भाषेत मांडलाय. ‘ती’ अधिक ठळक व्यक्त व्हायला हवी होती असं वाटलं. लगे रहो!
LikeLike