by Omkar Mankame
जेजे स्कूल मध्ये मोरे मामा आम्हाला मॉडेल म्हणून बसतात. वयवर्ष 85 च्या पुढे. प्रभादेवीला कुठेतरी राहतात असं सांगतात. दुपारी काय जेवतात माहीत नाही, विचारलं तर सांगतात माझी काळजी करू नका मी सकाळी खाऊन येतो.
22 वर्ष त्यांची कोर्टात केस चालू आहे, एका बिल्डर ने त्यांची जागा हाडपलीये. त्या जागेच्या नादात त्यांनी आपाला मुलगा ही घालवला, त्याला मारून टाकले म्हणे बिल्डर ने. मला म्हणतात माझ्यासारखा होता. ह्या वयात अजून ते ती केस लढत आहेत. महाबळेश्वर ला तारीख असली की तिकडे हजेरी लावतात. वकिलाला फी द्यायला पैसे लागतात म्हणून मॉडेल म्हणून बसतात. ते म्हंटले त्यांना न्याय मिळणार आहे, बिल्डरला खेचून हजर केला कोर्टात, निकाल लागला की पेढे देतो, तोवर मला सहन करा. मला तोपर्यंत काम द्या. सामान्य माणसाला न्याय मिळणं किती कठीण आहे, आणि ह्यावयात तर कठीणच. त्यांची जागा त्यांना मिळावी हीच इच्छा.